*औसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागेसाठी 59 उमेदवार मैदानात* 
औसा प्रतिनिधी 
-कृषी उत्पन्न बाजार समिती औसाच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये संचालक मंडळाच्या 18 जागेसाठी एकूण 59 उमेदवार निवडणूक मैदानात उतरले आहेत. 20 एप्रिल ही उमेदवारी अर्ज परत घेण्याची शेवटची तारीख होती.
 या निवडणुकीमध्ये आता 59 उमेदवार निवडणूक लढवीत असून मतदारसंघ निहाय उमेदवार संख्या पुढील प्रमाणे सहकारी संस्था सर्वसाधारण गटात 20, सहकारी संस्था महिला प्रवर्ग 6, सहकारी संस्था इतर मागास प्रवर्ग 4 आणि सहकारी संस्था भटक्या जमाती 2 ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघात 10, ग्रामपंचायत अनुसूचित जाती मतदारसंघातून 3 ,ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातून 4, व्यापारी मतदारसंघात 8 तर हमाल मापाडी मतदारसंघात 2 असे एकूण 59 उमेदवार निवडणूक लढवीत असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था एस के कदम यांनी दिली.

Post a Comment

0 Comments