औसा बाजार समितीच्या निवडणुकीसाठी 154 पैकी 140 अर्ज छाननी मध्ये वैध
औसा प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समिती औसाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये 154 उमेदवारांनी आपले विविध मतदारसंघातून नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. गुरुवार दिनांक 6 एप्रिल रोजी या नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात आली. या छाननी मध्ये 15 4 पैकी 140 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून 14 उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरले आहेत. या निवडणुकीमध्ये हमाल मापाडी मतदारसंघात 4, व्यापारी मतदारसंघात 18, ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वसाधारण जागेसाठी 23, ग्रामपंचायत मतदार संघ अनुसूचित जाती जमाती 7, ग्रामपंचायत मतदार संघ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक 6, सहकारी संस्था मतदार संघातील सर्वसाधारण घटकासाठी 57, सहकारी संस्था मतदार संघ महिला प्रतिनिधी 9, सहकारी संस्था मतदारसंघात इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 8, तर सहकारी संस्था भटक्या जमाती मतदारसंघातून 8 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.ग्रा.प. सर्व साधारण गटातुन 3, अनुसूचित जाती जमाती 2, आर्थिक दुर्बल घटक 1, सहकारी संस्थासाधारण गटातील 5 व महिला प्रवर्गातून 1,व सहकारी संस्था इतर मागास प्रवर्गातील 2 असे एकूण 14 नामनिर्देशन पत्र अवैध ठरले आहेत. अशी माहिती के.एस. कदम निवडणूक निर्णय अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती औसा यांनी दिली.
0 Comments