बेलकुंड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विशेषांकाचा प्रकाशन सोहळा संपन्न
 औसा प्रतिनिधी 

हिंदू खाटीक सामाजिक विकास संस्था आणि साप्ताहिक लातूर दर्शन परिवाराच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती सोहळ्यानिमित्त भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या साप्ताहिक लातूर दर्शन या विशेषांकाचा प्रकाशन सोहळा जिल्हा परिषद प्रशाला बेलकुंड चे मुख्याध्यापक किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते रिंगण लाईव्ह चॅनेल चे निर्माते राजू पाटील प्रमुख पाहुणे प्रा विजयकुमार घाडगे पाटील प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय छावा संघटना विद्यार्थी आघाडी, विष्णू कोळी सरपंच बेलकुंड, सचिन पवार उपसरपंच, बेलकुंड सोमनाथ दादा कांबळे संस्थापक, सम्राट युवा भीम संघटन शकील शेख, तंटामुक्ती समिती विष्णू साळुंखे, सरपंच सिद्धार्थ रसाळ तालुका अध्यक्ष मातंग शक्ती संघटना आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला. यावेळी बेलकुंड गावातील पाल्यांना उच्चशिक्षणासाठी प्रोत्साहित करणाऱ्या पालकांचा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी विजयकुमार घाडगे पाटील ती रिंगण लाईव्ह चॅनेल चे निर्माते राजू पाटील व कार्यक्रमाचे अध्यक्ष किरण पाटील यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमासाठी बेलकुंड व परिसरातील शेकडो आंबेडकर प्रेमी बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार राम कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन संयोजक विलास नामदेव तपासे यांनी केले.

Post a Comment

0 Comments