औसा मतदारसंघातील गुळखेडा वसवाडी हनुमान मंदिरासाठी 10 लक्ष निधी मंजूर
गुळखेडकरांनी आ.अभिमान्यू पवार यांचे मानले आभार
औसा प्रतिनीधी
सन 2022-2023 या आर्थिक वर्षातील तरतूदीनुसार सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा 25-12 या योजनेंतर्गत विकासकामांसाठी औशाचे आ. अभिमन्यू पवार यांच्या मागणीवरून औसा मतदारसंघातील गुळखेडा येथील जागृत देवस्थान असणारे वसवाडी हनुमान मंदिरांच्या सभागृह बांधकामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून २०२२-२३ अंतर्गत गुळखेडा गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत आ.पवार यांनी प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. त्या अनुषंगाने त्यांच्या मागणीची दखल घेत ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या कामांसंदर्भात संदर्भाधिन क्र. २ ते ८ येथील शासन निर्णय निर्गमित करण्यात आले असून
शासन निर्णयान्वये सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील तरतूदीतून सोबत जोडलेल्या अनुसूचीप्रमाणे गुळखेडा येथील वसवाडी हनुमान मंदिर सभागृह बांधकामांसाठी एकूण रु.१०.०० लक्ष इतक्या रकमेच्या कामांस प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याबद्दल समस्त गुळखेडा वाशियांनी आ.पवार यांचे मंदिर समिती कार्यकारिणीचे काकासाहेब भोसले ,अरविंद भोसले,सचिन गिराम,महालिंग गिराम, सुधीर भोसले,बाळू चिलबिले,ज्ञानेश्वर गायकवाड,धनंजय पांचाळ,दिनकर बेले,मल्हारी सुरवसे,दयानंद भोसले,महेश गिराम,बालाजी गिराम,बबन चेंडके,बालाजी सुरवसे,बांबू साखरे, हिराकांत चिलबिले,अमोल शिंदे,शरद भोसले ,अमीरहमजा बिडकर,यांनी आभार मानले असून सदरील सभागृह बांधकामांसाठी आ पवार यांच्या कडे वसवाडी हनुमान मंदिर समितीच्या वतीने मागणी व सतत पाठपुरावा केला होती. त्यामुळेच आ. पवार यांनी दखल घेत सभागृह बांधकामासाठी निधी दिल्यांचे अमोल चेंडके यांनी आमच्या प्रतिनीधी शी बोलताना सांगितले
0 Comments