औसा येथील कोर्टा समोरील मेन रोडवरुन काझी गल्ली/ खडकपुरा कडे जाणाऱ्या  विकास आराखडा (DP Plan) रस्त्यावरील व तसेच शहरातील इतरत्र ठिकाणी असलेले विकास आराखड्यातील अनाधिकृत अतिक्रमणे हटवा- काँग्रेस ची मागणी

औसा (प्रतिनिधी )

औसा येथील कोर्टा समोरील मेनरोड वरुन काझी गल्ली/ खडकपुरा कडे जाण्याचा विकास आराखडा  (डी.पी.प्लान) रस्त्यावरील व तसेच शहरातील इतरत्र ठिकाणी असलेले विकास आराखड्यातील अनाधिकृत अधिकृत हठवा अशी मागणी औसा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना  औसा शहर कॉग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.त्याचे  सविस्तर वृत असे की, औसा येथील कोर्टा समोरील मेन रोडवरुन काझी गल्ली/ खडकपुरा मार्गे शहरातील दक्षिण भागास जोडणारा विकास आराखड्यातील (DP Plan) मंजुर भू रस्ता असून सदर रस्त्यावर मागील अनेक दिवसापासुन अनाधिकृतपणे अतिक्रमण करुन नागरीकांच्या रहदारीस अडथळा निर्माण झालेला असल्याने कापड गल्ली, भावसार गल्ली, भोई गल्ली, खडकपूरा, मोमीन गल्ली, काझी गल्ली, कुरेशी गल्ली, या भागातील लोकांना रस्ता वापरण्यास अडथळा निर्माण झाला आहे. सचा सदरील रस्त्यावर कॉलमचे पक्के बांधकाम होत असल्याचे दिसून येत आहे. सदरील बांधकाम हे विनापरवाना डि.पी. प्लॅनच्या रोडवरच होत असल्याचे निदर्शनास आले आहे. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनीही डि.पी. का त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी निर्देशीत केले असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच जिल्हाधिकारी लातूर यांनीही पत्रान्वये सदरील अतिक्रमण हटविण्यासंबंधी सुचित केले असल्याचे दिसून आले आहे. अशा सर्व परिस्थितीत कापड गल्ली. - भावसार गल्ली, भोई गल्ली, खडकपूरा, मोमीन गल्ली, काझी गल्ली, कुरेशी गल्ली या भागातील सर्व नागरीकांच्या जनभावना व मागणीचा आदर करुन सदरील डिपी प्लॅन रस्ता तात्काळ अतिक्रमण मुक्त करण्यात यावे व तसेच  औसा शहरातील ज्या ज्या ठिकाणी डी.पी. प्लॅन आराखड्यातील अतिक्रमण झाले. आहे व नगर पालिकेच्या निदर्शनास आले आहे ते सुध्दा अतिक्रमण मुक्त करुन संबंधीत लोकांसाठी रस्ते मोकळे करण्यात यावे  "औसा शहरातील कोणत्याही अतिक्रमणाला कोणत्याही चुकीच्या कृत्याला काँग्रेस पक्ष कधीही पाठीशी घालत नाही किंवा कोणत्याही अतिक्रमणाला पक्षाचा पाठींबा नाही नगर परिषद औसा अतिक्रमणाला विशद कार्यवाही करीत असेल तर त्यास काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठींबा आहे.असे निवेदन औसा शहर कांग्रेस कमिटीचे शेख शकील शराध्यक्ष व मुजम्मील शेख,खुंदमीर मुल्ला,पुरुषोत्तम नलगे,अॅड. सिकंदर पटेल,जयराज कसबे,खाजा शेख, हाजी शेख आदि ने निवेदन द्वारा  मागणी केली आहे .

Post a Comment

0 Comments