पत्रकार संघातर्फे किशोर जंगाले यांचा वाढदिवस साजरा
औसा प्रतिनिधी
रूपा माता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे औसा शाखेचे व्यवस्थापक किशोर जंगाले यांचा औसा तालुका पत्रकार संघाच्या वतीने वाढदिवसानिमित्त सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरे, उपाध्यक्ष रोहित हंचाटे, व बालाजी उबाळे, सचिव महबूब बक्षी, पतसंस्थेचे कार्यकारी संचालक मिलिंद खांडेकर, विभागीय व्यवस्थापक गोपाळ जंगले, पत्रकार संघाचे सहसचिव विनायक मोरे, कार्यकारणी सदस्य रमेश दुरुगकर व राम कांबळे, गिरिधर जंगाले, कोरंगळा सोसायटीचे चेअरमन अशोक जंगाले, लहुजी साळवे कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष संभाजी शिंदे, गोविंद लोकरे यांच्यासह पतसंस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments