चंद्रपूर व औरंगाबाद जिल्हा निरीक्षक पदी विद्याताई पाटील

औसा प्रतिनिधी 
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या चंद्रपूर आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या निरीक्षक पदी औसा तालुक्यातील महिला आघाडीच्या धडाडीच्या कार्यकर्त्या विद्याताई पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख, माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, युवा नेते तथा आमदार धीरज देशमुख, शैलेश पाटील चाकूरकर, अशोकराव पाटील निलंगेकर, यांच्या शिफारशीवरून विद्याताई पाटील यांना चंद्रपूर आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या प्रभारी इलेक्शन पदावर काम करण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांच्या या नियुक्ती बद्दल काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, तालुका अध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी, शहराध्यक्ष शेख शकील आदी मान्यवरांनी अभिनंदन करून पक्ष संघटन वाढीच्या कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments