आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ऑर्बिट प्री-प्रायमरी इंग्रजी शाळेत इस्तेकबालिया रमजान,महिलांसाठी विविध स्पर्धा व मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.
औसा (प्रतिनिधी) -महेताबसाब अजमोद्दीन पटवारी एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी औसा द्वारा संचलित ऑर्बिट प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त फक्त महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर व विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये सर्व वयोगटातील महिला व मुलींना सहभाग घेण्याची संधी देण्यात आली होती. मेहंदी,पाककला/स्वयंपाक,संगीत खुर्ची,लेमन रेस,चित्रकला,हस्ताक्षर या स्पर्धेमध्ये 75 महिलांनी सहभाग घेतला.त्याचप्रमाणे रमजान महिन्याच्या स्वागतानिमित्त इस्तेकबलिया रमजान चे व्याख्यान तथा महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे ही आयोजन करण्यात आले होते.या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात महिलांच्या आरोग्य समस्या,त्वचा तपासणी तथा दंत तपासणी डॉ.सफुरा तझिन मोहम्मद सय्यद, डॉ.गुलनाज शोएब सुलतानी आणि डॉ.अमरीन अरबाज शेख या तज्ञ महिला डॉक्टरांनी केली.या आरोग्य शिबीरात एकुण 105 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.स्पर्धेमध्ये प्रथम,द्वितीय आणि तृतीय आलेल्या महीलांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून शेख नसरीन रहिमोद्दीन,आलेमा शेख तबस्सूम आसेफ,शेख आसेफा फकीरपाशा उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका अंजुमनेहा इकबाल शेख,शिक्षिका सय्यद आयशा,पटेल तरन्नूम,पठाण तहेनियत,बुशरा पंजेशा यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments