औसा नगर पालिकेसाठी देण्यात येणाऱ्या १५ वा वित्त आयोग निधी त्वरीत उपलब्ध करून द्यावा -खुंदमीर मुल्ला 
औसा प्रतिनिधी 
 राज्य शासनाकडून औसा नगर पालिकेला प्रत्येक वर्षी देण्यात येणारा १५ वा वित्त आयोग अंतर्गत निधी औसा नगर पालिकेला मागील १ वर्षापासुन न मिळाल्यामुळे औसा नगर परिषद कडून या निधीतून विद्युत पुरवठ्याचे बिल अदा केले गेले नाही. ज्यामुळे मागील ८ दिवसापासुन तसेच मागील १ महिन्यापासुन वारंवार महावितरणकडून पाणी पुरवठा करीता लागणार विद्युत पुरवठा सतत बंद करण्यात येत आहे. ज्यामुळे औसा शहरातील ५० हजार जनतेस कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
एकीकडे आपण हे राज्य जनतेचे आहे असे म्हणता व दुसरीकडे आपल्याच राज्यातील औसा नगर पालिकेचे रहिवाशी मागील १५ दिवसापासुन पाण्यासाठी वणवन फिरत आहेत. तरी याबाबत आपण त्वरीत निर्णय घेऊन औसा नगर पालिकेस १५ वा वित्त योजनेचा निधी त्वरीत 
उपलब्ध करुन देण्यात यावा.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता खुंदमीर मुस्तफा मुल्ला यांनी औसा तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना 29 मार्च बुधवार रोजी निवेदनद्वारे मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments