ऑर्बिट प्री-प्रायमरी शाळेत विज्ञान प्रदर्शन संपन्न
औसा(प्रतिनिधी) जागतिक विज्ञान दिनाचे औचित्य साधून आज औसा शहरातील ऑर्बिट प्री-प्रायमरी शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण करण्याबरोबरच त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविण्यासाठी हा विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आला होता.या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेख रसुलसाब गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शेख सलावोद्दीन ग्रामविकास अधिकारी,पत्रकार मजहर पटेल,उमर शेख, कुर्बान शेख,मुख्तार मणियार,असिफ पटेल,अजहर शेख,सैफुल्ला बागवान आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनात विद्यार्थी,विद्यार्थ्यांनी नी मोठा सहभाग घेतला होता.सदर विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांचे आयोजन केले होते.प्रदर्शनात विविध विषयावर प्रदर्शन मांडण्यात आले होते.तसेच विज्ञान प्रयोगासाठी वापरण्यात येणारी उपकरणे,सुक्ष्मदर्शक यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी विविध प्रकारे मांडणी करण्यात आली होती.त्याचप्रमाणे विविध विषयांवर विज्ञान प्रदर्शनाचे प्रात्यक्षिक मुलांनी करून दाखविले.प्रदर्शनात शाळेतील ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या विज्ञान प्रदर्शनाचा लाभ विद्यार्थी तसेच पालकांनी घेतला.प्रदर्शनासाठी मार्गदर्शन ऑर्बिट प्री-प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम इकबाल शेख व सर्व शिक्षकांनी केले होते.
0 Comments