नेत्यांचा वाढदिवस साजरा करत असताना लोकांच्या उपयोगात येईल असा उपक्रम आपण राबविले पाहिजे -श्री शैल्य उटगे
महाराष्ट्र राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त औसा येथे सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
त्या निमित्ताने आज दिनांक 21 मार्च मंगळवार रोजी औसा तालुका काँग्रेस कमिटी व विलासराव देशमुख युवा मंच यांच्या विद्यमाने ग्रामीण रुग्णालय औसा येथे सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्री शैल्य उटगे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
21 मार्च आणि अमित भैया देशमुख यांचा वाढदिवस आज या ठिकाणी औसा शहर कॉग्रेस कमिटी, तालुका काँग्रेस कमिटी आणि विलासराव देशमुख युवा मंच यांच्या वतीने औशामध्ये त्यांचा वाढदिवस एका सामाजिक उपक्रमाने साजरा होत आहे.या उपक्रमांमध्ये आज सर्व रोग निदान शिबिर ग्रामीण रुग्णालय औसा याठिकाणी ठेवला आहे.या शिबिरामध्ये जवळपास 450 ते 500 लोकांची नोंदनी या शिबिराच्या माध्यमातून याठिकाणी झालेली आहे.आणि आज तपासणी या ठिकाणी झाल्यानंतर जर पुढच्या उपचारच्या बाबतीत त्यांना गरज भासली तर निश्चितपणे आमची सगळी टिम जी आहे त्यांना पुढच्या उपचारासाठी सुद्या मदत करणार आहे.सामाजिक उपक्रम राबविण ही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त महत्वाचे असते.आणि त्यांना दिर्घ आयुष्य लाभावे, त्यांच्या हातून महाराष्ट्राची सेवा घडावी.उदयाचे नेतृत्व महाराष्ट्राचे त्यांनी करावे अशा सगळ्यांच्या वतीने मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. जिल्ह्यामध्ये आज प्रत्येक तालुक्यामध्ये अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविले जात आहेत.कोव्हिडच्या काळामध्ये ज्यावेळेस ख-या अर्थाने आपल्याला सगळ्यांना रक्ताची गरज होती तर त्यावेळेस आम्ही पुढाकार घेऊन 2100 रक्त बाटल्यांचा संकल्प केला होता.कारण आमच्या नेत्यांचा आवडता आकडा 21 आहे.कारण 21 शुगरच्या माध्यमातून 3 युनीट आणि विलास साखर कारखान्याचा एक 5 साखर कारखान्याचा जाळं ज्या तरुण नेतृत्वाचा आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने एखादी उभा केले.अश्या या नेत्यांच्या वाढदिवस साजरा करत असताना लोकांच्या उपयोगात येईल असा उपक्रम आपण राबविले पाहिजे. असे शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी श्री शैल्य उटगे बोलत होते.
या सर्व रोग निदान शिबिरामध्ये काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी, शहराध्यक्ष शकील शेख, अडवोकेट समीयोद्दीन पटेल, आदमखां पठाण, माजी नगरसेवक अंगद कांबळे, अडवोकेट मंजुषाताई हजारे, पुरुषोत्तम नलगे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष हाजी सय्यद अब्दुल हमीद, मुजम्मील शेख, अँडव्होकेट फैय्याज पटेल, जयराज कसबे, राजेंद्र बनसोडे, गणेश कसबे, दीपक कांबळे, इस्माईल शेख,अनीस जाहगिरदार, शेख सनाऊल्ला दारुवाले, विलासराव देशमुख युवा मंचचे तालुकाध्यक्ष रवी पाटील, शहराध्यक्ष खुंदमीर मुल्ला,नियामत लोहारे, मुस्तफा अलुरे,मुकरम शेख, मुन्ना सिंह ठाकूर, सिकंदर शेख,आरेफ कुमारकिरी,अरबाज पठाण, नय्युम काझी, अल्ताफ काझी,शुभम बाजुळगे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अंगद जाधव व त्यांच्या सर्व टीम, यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments