रमजान ईद दिवशी ईदगाह मैदान येथे मंडप टाकून पाण्याची सोय करावी-  एम आय एम ची मागणी 
औसा प्रतिनिधी 
आज दी. २९ मार्च बुधवार रोजी  एम आय एम पक्षाचे माजी औसा तालुकाध्यक्ष तथा रहबर-ए मिल्लत अँड.गफुरुल्लाहा हाशमी  यांच्या अध्यक्षतेखाली तसेच एम आय एम औसा शहर अध्यक्ष सय्यद कलिम  यांच्या मार्गदर्शनाखाली एम आय एम पक्ष औसा शहराच्या वतीने आज .मुख्याधिकारी  तथा प्रशासक नगर परीषद औसा यांच्या कडे.रमजान ईद दिवशी ईदगाह मैदान येथे भव्य मंडप टाकून पाण्याची सोय करावी या मागणीचे  निवेदन देण्यात आले. त्या निवेदनाचे सविस्तर वृत्त असे. दिनांक २२ / 0४ / २0२३/ रोजी ईद-ऊल-फीत्र ( रमजान ईद )च्या निमित्ताने औसा शहरातील ईदगाह मैदानात भव्य मंडप व वजु साठी पाणी व  ईतर सुविधा नगर परीषद च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात यावे.  औसा शहराच्याच्या वतीने मागील १0 वर्षा पासुन मागणी करण्यात येत असुन तसेच या वर्षी ऐन कडक उन्हाळ्यात रमजान ईद येत असुन ईद ची नमाज पठण करण्यासाठी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव ईद ची नमाज अदा करण्यासाठी ईदगाह मैदानावर येत असून सन २0१९ मध्ये एम आय एम पक्षाच्या मागणी नुसार औसा नगर परिषद च्या माध्यमातून रमजान ईद च्या दीवशी ईदगाह मैदानावर मंडप व ईतर सुविधा देण्यात आले होते. त्याच अनुषंगाने याही वर्षी ईद -ऊल - फीत्र ( रमजान ईद ) च्या निमित्ताने ईदगाह मैदानावर भव्य मंडप व ईतर सुविधा देण्यात यावे.अशी  मागणी एम आय एम औसा यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.  यावेळी निवेदन देताना एम आय एम चे  सय्यद जमीरोद्दीन शहर सचिव,कुरेशी ऊजेफ, अस्लम नवाब,देशमुख  शकील,पटवेकर मुक्तदीर एम आय एम औसा शहर सोशल मिडिया प्रमुख ईत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments