कारंजे फर्टीलायझर्स चा भव्य शुभारंभ 
औसा प्रतिनिधी
 औसा येथील प्रगतिशील शेतकरी आणि कुशल व्यापारी जयराजप्पा महालिंगप्पा कारंजे यांच्या संकल्पनेतून कारंजे फर्टिलायझर्स या शेतकरी बांधवांच्या सेवेत साकार होत असलेल्या कीटकनाशके रासायनिक खते व बी बियाणे विक्री सेवेचा शुभारंभ श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर हिरेमठ संस्थांचे सद्गुरु निरंजन शिवाचार्य महाराज, आमदार अभिमन्यू पवार, मल्लिकार्जुनप्पा उटगे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष भीमाशंकर राचट्टे व नगरपालिकेचे गटनेते सुनील उटगे, वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाषप्पा मुक्ता, सामाजिक कार्यकर्ते सदानंद शेटे यांच्यासह अनेक मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. कारंजे फर्टीलायझर्स या नवीन फॉर्मला शुभेच्छा देण्यासाठी औसा शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री महालिंगप्पा कारंजे, जयराज कारंजे, धनंजय कारंजे, केतन कारंजे, केदार कारंजे आणि प्रवीण कारंजे यांच्यासह परिवारातील सर्व सदस्य प्रयत्नशील होते.

Post a Comment

0 Comments