नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पदाधिकार्यांनी जाऊन केली पिकांची पाहणी
निलंगा
निलंगा तालुक्यात अवकाळी गाराच्या पाऊस, सुसाट्याचा वारा यामुळे शेतकऱ्याच्या शेतातील हरभरा, गहू ,ज्वारी, द्राक्ष ,केळी, शेवगा, सर्व भाजीवर्गीय पिक,अंबासहीत सर्व फळबागा चे अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याच्या हाता तोंडाला आलेला घास हिरावून घेतला गेला. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवेचनेत सापडला आहे.
*माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या सुचनेनुसार भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीत जाऊन नुकसान झालेल्या पिकाची पहाणी केली.अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याना धीर देऊन आपल्या तालुक्याचे आमदार संभाजी व , मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, पालकमंत्री,मुख्य व संपूर्ण शासन शेतकऱ्याचे हित जपणार आहे. त्यामुळे तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शासन लवकरच आपणास भरीव मदत करेल त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये अशी विनंती करण्यात आली. यावेळी जिल्हा सरचिटणीस माजी समाजकल्याण सभापती संजयजी दोरवे, ज्येष्ठ नेते चेअरमन दगडूजी सोळुंके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शेषरावजी मंमाळे, भाजपा तालुकाध्यक्ष शाहुराजजी थेटे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अ.जा.मो. संजयजी हलगरकर इ. उपस्थित होते.
0 Comments