औसा शहरातील नवी पेठ येथील जुना पोस्ट ऑफिस ते किल्ला मैदान पर्यंतचे खोदकाम केलेले रोड दुरुस्त करा..
औसा प्रतिनिधी 
औसा शहरातील नवी पेठ येथील जुना पोस्ट आफीस ते किल्ला मैदान पर्यंतची जियो इंटरनेट करीता उखडलेली रोड दुरुस्त करावी या करीता सदरील भागातील समस्त नागरिकांच्या वतीने औसा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात असे नमूद केले आहे.
नवी पेठ येथील जुना पोस्ट ऑफिस ते किल्ला मैदान येथील रोड जियो इंटरनेट कामासाठी रोडच्या मधोमध खड्डा करुन जियो इंटरनेटची केबल लाईन टाकण्यासाठी केली होती व ते काम पूर्ण करुन महिना झालेला आहे. तसेच या रोडवर नागरीकांना चालणे फिरणे अवघड झालेले आहे व दररोज छोटे मोठे अपघात होत आहे. तसेच हा रस्ता मेन रोड असून सदर भागात विद्यार्थी व जेष्ठ नागरीकांची सारखी वरदळ असते. त्यांनाही याचा त्रास होत आहे. तसेच सदर भागात राहणाऱ्या नागरीकांना धुळीचा त्रास होऊन आरोग्यावर परिणाम होत आहे.
तरी मुख्याधिकारी यांनी वरील बाबीचा विचार करून रोडचे काम त्वरीत करावे. 
अशी मागणी सदरील भागातील समस्त नागरिकांच्या वतीने आज दिनांक 6 मार्च सोमवार रोजी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. यावेळी या निवेदनावर 
 मुहंमद मुंगले, वसीम मुंगले, डॉ.सतीश बाजपाई,खाजा मैनोद्दीन शेख अजमोद्दीन, चाबरु अब्बु सावकार,जमील बोरफले,शमशोद्दीन शेख,जाफर मुंगले,राजू मुंगले,सलीम चौधरी, अखील मन्यारी,असलम चाबरु,चाबरु एम ए ,बाबुमिंया लोहारे, रफिक मुंगले,नबीसाब मन्यारी,मुन्नाजी मन्यारी,गौस हलसिंगे, शमशोद्दीन सावकार, रफीक मन्यारी आदिच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments