विठ्ठल नामाच्या गजरात औसा येथून तेरला पायी दिंडी रवाना 
औसा (प्रतिनिधी) दि.१६
 अखिल भारतीय वारकरी मंडळाचे औसा तालुका संघटक गोरोबा तुळशीराम कुरे यांच्या पुढाकारातून मागील अनेक वर्षापासून  श्रीक्षेत्र तेर येथील श्री संत गोरोबाकाका मंदिर दर्शनासाठी पायी दिंडीची परंपरा अखंडपणे चालू आहे.शुक्रवार दिनांक 16 मार्च रोजी दुपारी तीन वाजता औसा शहरातील मुख्य रस्त्यावरून संत गोरोबा काका यांच्या मुक्तीची प्रतिमा रथामध्ये बसवून प्रतिमेचे पूजन करून टाळ मृदंगाच्या निनादात दिंडीचे प्रस्थान झाले.बऱ्हाणपूर,  भादा,  वडजी, भेटा, कोंड,  जागजी, मार्गे ही पायी दिंडी एकादशीच्या दिवशी श्रीक्षेत्र तेर येथे जाते. मंदिर प्रदक्षिणा व दर्शनानंतर रात्री भव्य कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे दिनांक 16 ते 21 मार्च 2023 या कालावधीमध्ये ह भ प संतोष वगरे महाराज,  दगडू पंथ  जोशी महाराज, खंडू भटूरे महाराज,  मोहन भोंग महाराज, आणि वैजनाथ उत्सुरे महाराज यांचे पायी दिंडी मार्गावर ठिकठिकाणी नामसंकीर्तन आयोजित करण्यात आले आहे. तर दिनांक 21 मार्च रोजी ह भ प नवनाथ महाराज चिखलीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सकाळी नऊ वाजता या दिंडीचा समारोप होणार आहे. टाळ मृदंगाच्या निनादात अनेक महिला पुरुष या दिंडीमध्ये विठ्ठल नामाचा गजर करीत भक्ती भावाने सहभागी झाले आहेत.
या दिंडीच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री बाळू दंडे, नागनाथ साळुंखे, बाळू मोरे, राजाभाऊ ताकभाते, कृष्णा कोलते, बाबुराव यादव, यांचा सहसंयोजन समितीचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

Post a Comment

0 Comments