चलबुर्गा पाटीजवळील अपघातात ४ ठार ४ जखमी
औसा-(प्रतिनिधी.)दि. २७
पुणे येथे मेव्हण्याचे  लग्न विधी उरकून गावाकडे निघालेल्या सुझकी कंपनीची  ब्रेजा गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने औसा तालुक्यातील औसा-निलंगा रोडवरील चलबुर्गा पाटीजवळील एका खड्यात गाडी गेल्याने या अपघातात ४ ठार तर ४ जण जखमी झाल्याची घटणा सोमवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.  
याबाबत अधिक माहीती अशी की, निलंगा येथील बडूरकर फॕमीली हे मेव्हण्याच्या लग्न समारंभासाठी परवाच ते निलंगा येथून गाडी क्र. एम एच २४ ऐ. एफ ७०५० ने सदरील फॕमीली  पुण्याला गेले होते. लग्न विधी उरकून ते आपल्या गावाकडे राञीच उशिरा निघाले होते. सदरील गाडी ही सकाळी ७.०० वा. औसा पास करुन पुढे निलंगा येथे जाण्यासाठी निघाली परंतू वाटेतच चालकाचे गाडीवरील नियंञण सुटल्याने एका खोल खड्यात गाडी जाऊन या अपघातात  ४ ठार तर ४ जखमी झालेले आहेत. 
या विचीञ अपघातातील मयतामध्ये अंश किरण बडूरकर (वय ११ ), जय सचीन बडूरकर (वय १२), अमर सचीन बडूरकर (वय १६), आणि प्रकाश लक्षमण कांबळे (वय २०) सर्व रा. निलंगा हे चार जण जागीच ठार झाले.
 याच अपघातातील जखमीमध्ये गोदावरी उर्फ सारीका सचीन बडूरकर (वय ४५), जानवी सचीन बडूरकर (वय १०), यश किरण बडूरकर (वय १९),सचीन डिगंबर बडूरकर (वय ५०) हे अपघातात जखमी झाले आहेत.
 नातेवाईकांच्या परिवारातील मुलाचे पुणे येथे लग्न समारंभ संपन्न करून गावी परतत असताना सकाळी लातूर गुलबर्गा राष्ट्रीय महामार्गावर चलबुर्गा पाटी ( ता. औसा जिल्हा लातूर ) जवळ अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा  मृत्यू झाला. तर अन्य एकजण असे चार जण या अपघातात मृत्यु झाले आहेत. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन पुलाखाली पलटी होऊन पडले आहे.

Post a Comment

0 Comments