आर.टी.ई अंतर्गत शैक्षणिक प्रवेशा करीता पालकांनी अर्ज सादर करावेत - उपसभापती किशोर जाधव

औसा / सन २०२३- २०२४ करीता आर.टि.ई कायद्या अंतर्गत पहिली ते आठवी पर्यंतच्या मुलांच्या खाजगी इंग्लिश माध्यम व सेमी माध्यम च्या शाळेत मोफत शिक्षण मिळवण्या करीता १ जुलै २०१६ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीतील मुलांच्या पालकांनी १७ मार्च पुर्वी अर्ज सादर करावेत असे आवाहन  शिवसेना ठाकरे गटाचे किशोर जाधव यांनी केले आहे.

आर टी ई च्या माध्यमातून साधारण ४ प्रवर्गातील नागरीकांना अर्ज सादर
करण्यात येतो. यात सामाजिक मागासवर्गीय, आर्थिक मागास, अनाथ बालक, दिव्यांग अथवा एचआयव्हीबाधित मुले असे चार प्रवर्गातील विद्यार्थी या योजनेला पात्र ठरतात या मध्ये १ लाखा रूपयां पेक्षा कमी उत्पन्न असलेले सर्वच प्रवर्गातील नागरिक हि या योजनेस पात्र ठरतात. या संपर्क साठी आवश्यक कागदपत्र विद्यार्थ्यांचा जन्माचा दाखला, सामाजिक मागास असलेल्या साठी पालकाचा जातीचा दाखला, अर्थीक मागास प्रवर्गातील पालकाचा १ लाख रूपयांच्या आतील उत्पन्नाचा
दाखला, रहिवाशी पुरावा म्हणून, लाईट बील, आधार कार्ड, मतदान कार्ड, यापैकी एक हि नसेल तर भाडे करारनामा इत्यादी कागदपत्र आवश्यक आहेत. याची ऑनलाईन स्वरूपात student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर हि अर्ज सादर करता येतात त्या करीता लवकरात लवकर पालकांनी अर्ज सादर करण्या करीता साधून आपल्या पाल्याचा सन २०२३ - २०२४ या शैक्षणिक सत्रात आर.टि.ई २५ टक्के प्रवेशासाठी १७ मार्च पुर्वीच अर्ज सादर करावेत असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे किशोर जाधव यांनी केले आहे. याची सर्व लाभार्थ्यांनी दखल घ्यावी.

Post a Comment

0 Comments