सैनिक फेडरेशनच्या जिल्हा संघटक पदी किसन कोलते यांची नियुक्ती

औसा प्रतिनिधी
  सैनिक फेडरेशन ही संघटना सेवानिवृत्त माजी सैनिक व सेवेत असणाऱ्या सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच सैनिकांवर होणारे अन्याय व अत्याचार थांबविण्यासाठी महाराष्ट्रात कार्यरत आहे. सैनिक फेडरेशनच्या लातूर जिल्हा संघटक पदी औसा येथील सामाजिक कार्यकर्ते किशन बन्सीलाल कोलते यांची नियुक्ती सेवानिवृत्त ब्रिगेडियर तथा माजी खासदार सुधीर सावंत यांनी केली आहे. लातूर जिल्ह्यातील सैनिकांच्या संघटन करून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी किशन कोलते यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. किशन कोलते यांच्या नियुक्ती बद्दल सुदर्शन बिराजदार, शिवशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दादा कोपरे, रिंगण लाईव्ह चॅनेल चे निर्माते राजीव पाटील, धनंजय कोपरे, पत्रकार राम कांबळे, विनायक मोरे, शिवाजी भातमोडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा काशिनाथ सगरे, अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक संघाचे राम शिंदे, बाबुराव शिंदे, लहुजी साळवे कर्मचारी महासंघाचे तालुका अध्यक्ष संभाजी शिंदे, सागर पंढरीनाथ जाधव, राजू कसबे, बालाजी शिंदे, लक्ष्मण शिंदे आदी मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments