*महाराष्ट्र विद्यालयातील शिष्यवृत्ती परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांचा तालुका आमसभेत सत्कार.*
-------------------------------------
किल्लारी : येथील महाराष्ट्र विद्यालयातील इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, यामध्ये हर्ष दिगंबर टाचले व मयुरी मल्लिकार्जुन बिराजदार या विद्यार्थ्यांनी इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याबद्दल औसा तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती औसा येथे आयोजित करण्यात आलेल्या आमसभेत विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार अभिमन्यूजी पवार साहेब यांच्या हस्ते व गट विकास अधिकारी म्हेत्रे साहेब, तहसीलदार सूर्यवंशी साहेब, तालुका कृषी अधिकारी ढाकणे साहेब व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पालक, प्राचार्य सतीश भोसले व शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शक मनोज आडगळे यांच्या समवेत करण्यात आला. या यशाबद्दल संस्था अध्यक्ष प्रदिपदाजी जगताप, उपाध्यक्ष रणजितसिंह ठाकूर, सचिव अरविंददाजी भोसले सर्व संचालक मंडळ यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना व शिक्षकांना अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments