औसा प्रतिनिधी
औसा जेष्ठ नागरिक संघाचे माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित्त नाथ नगर औसा येथील कर्तबगार, वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करून गौरव करण्यात आला.यामध्येसौ.सविता कल्याणी,सौ.मीनाताई गोमदे,सौ.सरस्वती पंडीत,सौ.संजीवनी क्षिरसागर,सौ.सुकुमार घोडके यांना सत्कार मुर्ती म्हणून गौरविण्यात आले.यावेळी आपल्या जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व पदाधिकारी उपस्थित होते, त्याचप्रमाणे विभागातील बरेच बंधु भगिनी हजर होते,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोरे सर यांचे भाषण झाले,व आभार प्रदर्शन संभाजी शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री कमलाकर वैजवाडे, सुरेश स्वामी , सुरेश कल्याणी, पंढरीनाथ जाधव,दादा कोपरे,राम शिंदे,अजहर पटेल, बाबुराव शिंदे,एम एम ठेंगाडे पंचप्पा स्वामी यांनी अथक परिश्रमाने हा कार्यक्रम यशस्वी केला.
0 Comments