लातुर शहरतील दहा दिवसीय उपासिका धम्मसंस्कार प्रशिक्षण शिबिराची सांगता
लातूर:लातुर शहरातील श्रावस्ती नगरातील श्रावस्ती बुद्ध विहार ट्रस्ट संचलीत श्रावस्ती बुद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा लातुरच्या वतीने दहा दिवसीय ऊपासिका धम्मसंस्कार प्रशिक्षण शिबीराची सांगता झाली.
यावेळी जेष्ठ बौद्धाचार्य देवदत्त बनसोडे,केंद्रीय शिक्षक अशोक शिंदे,केंद्रीय शिक्षीका कविता कांबळे,करुणा कांबळे,माया कांबळे,वंदना कांबळे,शारदा हजारे मंचावर होत्या.प्रथम बुद्ध,भिमाच्या प्रतिमांना धुप,दिप,पुष्पाने अभिवादन केले.मार्गदर्शक गुरुजनांचे पुष्पहार,गुलाब पुष्पाने स्वागत केले.प्रशिक्षणार्थी पैकी संजीवनी गुंजुरगे,रमाईकार कु.डाॅ.वैभवी घारगावकर,अर्चना माने,प्रतिभा सावळे यांनी मनोगते मांडली.यावेळी सर्वांना लाख लाख मंगल कामना देवुन या धम्मप्रशिक्षणाच्या माध्यमातुन शीलसदाचाराने जिवन जगावे.बुद्ध,भिम,रमाईच्या मार्गाने चालत मंगलमैत्रीने प्रबुद्ध भारत घडवा असे आवाहन देवदत्त बनसोडेंनी केले.
0 Comments