लाईनमन दिनानिमित्त लाईनमन चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार

औसा प्रतिनिधी 
लाईनमन दिनानिमित्त आज औसा येथे 
राष्ट्रवादी काँग्रेस औसाच्या वतीने आज लाईनमन दिवस आहे.त्या निमित्ताने आज 4 मार्च शनीवार रोजी औसा शहरातील सर्व लाईनमन यांचा शाल व पुष्पहार घालून त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार करून  लाईनमन दिन साजरा करण्यात आला.  यावेळी या लाईनमन दिनच्या सत्कार प्रसंगी औसा येथील लाईनमन फोरमन शेख साहेब, मुंडे साहेब, गाडवे साहेब, हुडगे साहेब टोम्पे साहेब, बिराजदार साहेब, आकुसकर साहेब, खजुरे साहेब, गायकवाड साहेब, सोनटक्के साहेब, कांबळे साहेब, जामगे साहेब, कोलते साहेब, कुलकर्णी मॅडम, विभुते मॅडम या सर्व लाईनमनचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी. नगराध्यक्ष जावेद शेख ,माजी. पाणी पुरवठा सभापती गोविंद जाधव,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष अविनाश टिके, विद्यार्थीचे जिल्हाध्यक्ष वकील इनामदार,सेवा दलाचे अध्यक्ष कृष्णा सावळकर,ओबीसी सेलचे शहराध्यक्ष मुकेश तोवर, व बाशीदभाई आदि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments