हर्षवर्धन कोपरे यांचे तबलावादन परीक्षेत उज्जवल यश..



औसा/ प्रतिनिधी : - येथील श्री मुक्तेश्वर देवालय विश्वस्त समितीचे संचालक धनंजय कोपरे यांचे नातू हर्षवर्धन रविराज कोपरे या विद्यार्थ्यांनी माऊली संगीत विद्यालय औसाच्या माध्यमातून अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई अंतर्गत घेण्यात आलेल्या संगीत तबलावादन परीक्षेमध्ये विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन उज्जवल यश संपादन केले आहे. माऊली संगीत विद्यालयाचे मार्गदर्शक पंडित शिवरुद्र स्वामी, पत्रकार शिवाजी भातमोडे, संगीतकार रमेश भुजबळ, प्रसिद्ध गायक वेदांग धाराशिवे, मुक्तेश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष ॲड. मुक्तेश्वर वागदरे सामाजिक कार्यकर्ते दादा कोपरे, रामभाऊ शिंदे, पत्रकार राम कांबळे, युवराज हलकुडे, उमाकांत मुरगे, शंकर अप्पा सिंदुरे, प्रकाश वाघमारे, वैजिनाथ सिंदुरे, उमाशंकर औटी, दत्तात्रेय माळी, ज्ञानवर्धिनी महिला भजनी मंडळाच्या कार्यवाह सरोजिनी कठारे, महानंदा कोपरे, सुमनताई मुळे, शोभा भोजने, भारतबाई औटी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हर्षवर्धन रविराज कोपरे यांच्या यशाबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments