पंचायत समिती  औसा येथे उमेदच्या सर्व सी.आर.पी महिला वर्गाची बैठक

औसा प्रतिनिधी 

आज पंचायत समिती औसा येथे उमेदच्या सर्व सी.आर.पी महिला वर्गा ची बैठक संपन्न झाली. आमदार अभिमन्यू भैया पवार  यांनी कॉन्फरन्स द्वारे सर्व महिला वर्गाशी संवाद साधला.उपस्थित गटविकास अधिकारी म्हेत्रे साहेब, आमदार अभिमन्यू भैया पवार यांच्या पत्नी सौ. शोभा अभिमन्यू  पवार, संजू भाऊ कुलकर्णी ,नांदुर्गा सरपंच अश्विनीताई घाडगे ,तालुका अध्यक्ष विजय माला रणदिवे , नारायण भाऊ साळुंखे, प्रा. सोनाली ताई गुळबिले. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बचत गटाच्या महिला वर्गाचा सन्मान व निधी वाटप. तसेच 10 मे 2023 ला आमदार अभिमन्यू भैया पवार साहेब यांचे सुपुत्र Adv.परीक्षेत यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न होणार आहे. त्या विवाह सोहळ्याचे आमंत्रण व 15 एप्रिल पर्यंत ग्रामीण भागातील  सामूहिक विवाह मध्ये विवाह करण्यासाठी नोंदणी करण्यासंदर्भात हि बैठक संपन्न झाली. सामूहिक  विवाह सोहळ्यामध्ये विवाह करण्यासाठी जर कोणी इच्छुक असतील तर त्यांनी संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments