डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास जागा उपलब्ध करून द्यावी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती औसा यांची मागणी 
औसा प्रतिनिधी 
 औसा शहरांमध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास जागा उपलब्ध करून देण्यात यावी या मागणीसाठी आज औसा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने औसा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना  निवेदन देण्यात आले.या निवेदनाचे सविस्तर वृत्त असे, औसा हे ऐतिहासिक वारसा असलेले शहर आहे. या शहरामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे अशी डॉ बाबासाहेब आंबेडकर समितीची  मागणी आहे. कारण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तमाम भारतीयांचे प्रेरणास्थान आहेत. जो व्यक्ति आपल्या आयुष्यामध्ये कांहीतरी मिळविण्यासाठी एक मुकाम (उंची) हासिल करण्यासाठी आहे. अशा प्रत्येकाचे ऊर्जास्थान आहेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजातील शेतकरी, कष्टकरी,

कामकरी तसेच महिलांच्या उध्दारासाठी ज्यांनी अनेक महत्वपुर्ण निर्णय घेतले अशा महामानवाप्रती सदेव

कृतज्ञ राहावे अशी प्रत्येकाची इच्छा आहे. औसा नगर परिषदेने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नांवाने स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र

सुरु केले आहे. या अभ्यासिका केंद्रामध्ये औसा तालुक्यातील मुले, मुली एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी. अशा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी येतात. अशा मुलांना प्रेरणा मिळावी म्हणून औसा शहरामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे अशी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची मागणी आहे.

औसा तालुक्यातील बुधोडासारख्या ग्रामीण ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्यदिव्य स्मारक आहे. परंतु औसा हे तालुक्याचे ठिकाण असून अशा तालुक्याच्या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक नाही हे अतिशय निंदनिय दुदैवी व खेदजनक आहे.

या अनुषंगाने औसा नगर परिषदेच्या सभागृहाच्या सभेमध्ये 2015 मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास नगर परिषद सांस्कृतिक सभागृहासमोरील जागा देण्याचा ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला आहे. पण दुदैवाने अद्याप या ठरावाची अंमलबजावणी झाली नाही तेव्हा आपण या ऐतिहासिक कार्यामध्ये मोलाचे सहकार्य करुन या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे. तेव्हा आपणास विनंती
की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती अगोदर आम्हाला सदर जागा उपलब्ध करून दयावी अन्यथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती औसा यांच्या वतीने तीव्र आंदोलन, मोर्चा, उपोषण अशा माध्यमातून प्रशासनाचा निषेध करण्यात येईल. यांची सर्वस्वी जबाबदारी नगर परिषद औसा प्रशासनाची राहील. याची गांभिर्याने नोंद घ्यावी.अशी  मागणी औसा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या निवेदनावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक नारायण बनसोडे,डांगे कल्पना ताई सुंदरराव महिलाध्यक्षा, निता सुरेश सुर्यवंशी उपाध्यक्षा, किर्ती अशोक कांबळे सचीव,वसंत दिलीप लोंढे उपाध्यक्ष, सुरेश भिवाजी सुर्यवंशी कार्याध्यक्ष,शरद देविदास बनसोडे सहकार्याध्यक्ष, राजेंद्र साधू बनसोडे सचीव, धनराज लहु लोंढे सहसचिव,शिवदास तुकाराम बनसोडे कोषाध्यक्ष, प्रदीप प्रभाकर कांबळे, मारुती दिगंबर कांबळे, आशिष राजेंद्र कांबळे, बालाजी माणिक बनसोडे राजेंद्र माधवराव बनसोडे आदि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्यांचे स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments