औसा बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी कडून  अँड समीयोद्दीन पटेल व पाशा शेख यांना उमेदवारी द्यावी- औसा अल्पसंख्याक कॉग्रेस सेल ची मागणी
औसा प्रतिनिधी
आगामी होऊ घातलेल्या औसा बाजार समिती निवडणुकीत माजी नगरसेवक समियोद्दीन पटेल व पाशा अमीन शेख यांना महाविकास आघाडी कडून उमेदवारी द्यावी. या मागणीसाठी आज दिनांक 28 मार्च मंगळवार रोजी औसा अल्पसंख्यांक कॉग्रेस सेलच्या वतीने काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष यांच्याकडे लेखी मागणी केली आहे.
त्याचे सविस्तर असे येणाऱ्या काळात औसा बाजार समितीची निवडणूक ची घोषणा झालेली असून या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून एकत्रित निवडणूक लढवीत असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस पक्षातील दिवंगत माजी नगराध्यक्ष अँड मुजबोद्दीन पटेल यांचे चिरंजीव तथा माजी नगरसेवक अडवोकेट समीयोद्दीन पटेल यांना व्यापारी गटातून तसेच यापूर्वी बाजार समितीचे संचालक असलेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पाशा अमीन शेख यांना हमाल गटाकडून उमेदवारी देऊन अल्पसंख्यांक समाजाच्या व्यक्तीला बाजार समितीचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात यावी. अशा या  मागणीचे लेखी निवेदन अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष हाजी सय्यद हमीद कंडक्टर  व अल्पसंख्याक विभागाचे औसा शहर कार्याध्यक्ष   हाजी इस्माईल शेख यांनी काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष श्री शैल्य दादा उटगे यांना निविनाद्वारे लेखी मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments