निसर्गाचा लहरीपणा एकाच झाडाला कोवळी पाने,मोहर आणि आंबे; औसा तालुक्यातील वास्तव चित्र
औसा: सध्या निसर्गाचा आंबेमोहर सीजन सुरू असून या सिझनमध्ये निसर्गाचा लहरीपणा दिसून येत आहे.याला काय कारण असेल हे अनेकांना स्पष्ट होत नाही असेही निसर्गाचा लहरीपणा अनेक आंबे झाडांच्या बाबतीत दिसून येत आहे.
यापूर्वी आपण अनेक वेळा पाहिले असेल की एका झाडाला एकाच वेळी मोहर लागणे आणि त्याचे रूपांतर फळांमध्ये होणे किंवा कोवळी पाणी फुटत असताना एका झाडाला एकाच वेळी फुटतात परंतु सध्या निसर्गाचा लहरीपणा आणि वातावरणातील अवास्तव बदल याला काय कारण असेल जे निसर्ग मध्ये ही समतोल राहिला नाही तर असमतोलपणे वेळी अवेळी होणारे नैसर्गिक बदल हे अनैसर्गिक बदल होत असल्याचे स्पष्ट चित्र औसा तालुक्यामध्ये पाहण्यास मिळत आहे.
कारण भादा तालुका औसा येथील देविदास एकनाथ उबाळे यांच्या घरासोरील आंब्याच्या झाडाला कोवळी पाने मोहर आणि आंबे लागले असल्याचे शेत शिवारात ही असेच दिसून येत आहे.
यामुळे याला नैसर्गिक चमत्कार की मानवनिर्मित माणसातील स्वभावाचा लहरीपणाचा अंगीकार हा निसर्गानेही केला आहे काय?असा प्रश्न मानवांना नक्कीच पडल्याशिवाय राहत नाही.
निसर्गात दिवसेंदिवस उत्पन्न वाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून शेती उत्पादन घेण्यासाठी अत्यंत आत्मघातकी औषध रुपी स्लो विष कोणत्याही भाजीपाला व फळ प्रक्रिया करण्यासाठी व्यापारी आणि शेतकरी सरास बाजारात वापरताना दिसत आहेत.यामुळे नागरिकांना विनंती केली जात आहे की,बाजारातील जैविक पद्धतीने उत्पन्न काढलेल्या वस्तूच विकत घ्याव्या अन्यथा नैसर्गिक शेती उत्पादन घेण्यासाठी जाऊ नये अशी मागणी केली जात आहे.
0 Comments