महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेचे डॉ शांत वीर शिवाचार्य महाराज यांच्याकडून स्वागत
 औसा प्रतिनिधी
 महाराष्ट्र राज्यातील लिंगायत समाजाच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक मागासले पण दूर करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत सहानुभूतीपूर्वक विचार करून महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून या महामंडळासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल या निर्णयाचे औसा येथील हिरेमठ संस्थांचे मार्गदर्शक तथा ईशान्येकडील सात राज्याच्या सेंट्रल वेअर हाऊसिंग कार्पोरेशनचे डायरेक्टर शांतवीर लिंग शिवाचार्य महाराज यांनी स्वागत केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी लिंगायत समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शांतिवीर लिंग शिवाचार्य महाराज यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची मुंबई येथे भेट घेऊन सत्कार केला याप्रसंगी त्यांच्या सोबत महाराष्ट्रातील विविध मतातील शिवाचार्य महाराज यांच्यासह वीरशैव लिंगायत समाजाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments