आनंदाचा शिधा वितरणाचा औसा येथे शुभारंभ
औसा प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा म्हणून साखर, रवा, चणाडाळ प्रत्येकी एक किलो आणि एक लिटर गोडेतेल असलेला आनंदाचा शिधा प्रत्येक शिधापत्रिका धारकांना शंभर रुपयांमध्ये देण्याची योजना कार्यान्वित केली आहे. गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती चे औचित्य साधून राज्य सरकारने हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला असून आनंदाचा शिधा वितरणाचा औसा येथे शुभारंभ आमदार अभिमन्यू पवार यांच्या शुभहस्ते तसेच तहसीलदार भरत सूर्यवंशी आणि तालुका पुरवठा अधिकारी लालासाहेब कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला. याप्रसंगी शहरातील सर्व स्वस्त धान्य दुकान चालक व पात्र लाभार्थी उपस्थित होते. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आनंदाचा शिधा वितरणाचा शुभारंभ करण्यात आला असून तालुक्यातील हजारो शिधापत्रिकाधारकांना या योजनेतून जीवनावश्यक अन्नधान्याचे किट मिळणार आहे. त्यामुळे नागरिकात समाधान दिसून येत आहे.
0 Comments