वारकरी मंडळाच्या तालुका कार्यकारणी सदस्य पदी आत्माराम मिरकले व व्यंकट पवार 

औसा प्रतिनिधी
 
अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश बोधले महाराज डिकसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष लालासाहेब देशमुख यांच्या सूचनेवरून तालुका अध्यक्ष खंडू महाराज भादेकर यांनी अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या औसा तालुका कार्यकारणी सदस्य पदी वानवडा येथील आत्माराम हरिबा मिरकले व औसा येथील व्यंकट दादाराव पवार यांची नियुक्ती केली आहे. वारकरी मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सिद्रामाप्पा राजट्टे, तालुका संघटक गोरोबा कुरे, सूर्यकांत कुलकर्णी, अष्टेकर, अनिल उटीकर, वीरभद्र कोपरे, आत्माराम बनसोडे, दगडू मुंजाळ यांच्या उपस्थितीमध्ये उभयतांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments