कॉंग्रेस पक्षाच्या विजयाचा औसा शहरात महाविकास आघाडीच्या वतीने जल्लोषात स्वागत 
औसा प्रतिनिधी 
कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे रवींद्र धनगेकर यांच्या रूपाने महाविकास आघाडी चा मोठ्या प्रमाणात झालेल्या विजयाचा जल्लोष औसा शहरात कॉंग्रेस, शिवसेना, व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित साजरा केला. यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी, आतिषबाजी करण्यात आली.
     याप्रसंगी प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस अमर खानापुरे यांनी सांगितले कि कसबा मतदार संघाचा इतिहास हा परिवर्तनाचा व जनतेचे राज्य निर्माण करण्याचा राहिलेला आहे.
        स्वराज्य निर्मितीची मुहूर्तमेढ याच भूमीत मां जिजाऊ यांनी सोन्याचा नांगर फिरवून रोवली. याच भूमीतून स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच या गर्जनेसह लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीच मावळत नव्हता अशा बलाढ्य इंग्रजांच्या विरोधात संपूर्ण स्वातंत्र्याची लढाई पुकारली. आज त्याच पुण्यातील कसबा मतदारसंघात रवींद्र धनगेकर यांच्या रूपाने काँग्रेस ने जनतेच्या माध्यमातून स्वराज्य निर्मितीसाठी मत रुपी नांगर फिरवला. लवकरच भाजपाच्या लोकशाही ला घातक राजवटीचा अंत होणार हे निश्चित आहे व पुढील सर्व निवडणुकीत महाविकास आघाडीचा सर्वच निवडणुकात विजय होईल असा विश्वास या प्रसंगी त्यांनी व्यक्त केला. 

या विजयोत्सवात कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे, शिवसेना नेते सुरेश दादा भुरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस चे नगर सेवक गोविंद जाधव, हणमंत राचट्टे , शेख शकील, दत्तोपंत सूर्यवंशी, संजय उजलंबे, दीपक राठोड, विवेक मिश्रा,जयराज कसबे, अंगद कांबळे , बबन बनसोडे, हमीद शेख, शहनवाज पटेल, मुजम्मील शेख  युवा सेना आकाश मंदे, खुंदमीर मुल्ला, साठे, चैतन्य घोगरे, ख्वाजा शेख, सुलतान शेख,सुमित पारुडकर, गीतेश शिंदे, पाशा भाई शेख, फय्याज पटेल व इतर अनेक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments