वादळी वाऱ्यासह गारपीटग्रस्त शेतीची पालकमंत्री गिरीजी महाजन  घेतली तात्काळ दखल
लातूर 
        निर्णय वेगवान महाराष्ट्र शासन गतिमान या उक्तीचा प्रत्यय नुकताच अनुभवयास मिळाला भारतीय जनता पार्टीचे लातूर जिल्हाध्यक्ष *आ रमेशआप्पा कराड*यांनी लातूर ग्रामीण मध्ये अचानकपणे झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या नुकसानीची दूरध्वनीद्वारे जिल्ह्याचे *पालकमंत्री ना गिरीजी महाजन यांना माहिती दिली असता तात्काळ पंचनामे करण्याच्या केवळ सूचनाच दिल्या नाहीत तर तातडीने लातूरला येऊन नुकसानीची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला.
         शनिवारी दुपारी लातूर ग्रामीण मधील बहुतांशी गावात अचानकपणे वादळीवारासह गारांचा प्रचंड पाऊस झाला हाता तोंडाशी आलेले गहू ज्वारी हरभरा हे रब्बीचे पीक एका क्षणात उध्वस्त झाले. द्राक्ष आंबा चिकू यासह फळबागा झडून गेल्या. भाजीपालाचा तर चिखलच झाला उद्याची स्वप्न डोळ्यात साठवून कष्टाने मेहनतीने वाढवलेली रब्बी हंगामच नष्ट झाली आणि बळीराजा पुन्हा एकदा अडचणीत आला जसा जसा गारांचा पाऊस पडू लागला तसे तसे लातूर ग्रामीण मधल्या अनेक गावातून भाजपा कार्यकर्त्यांचे नागरिकांचे आणि शेतकऱ्यांचे आ रमेशआप्पा कराड यांना फोन येऊ लागले *आप्पासाहेब लय नुकसान झालंय हो, सरकार आपल आहे आमच्याकडे बघायला सांगा शेतकऱ्यांच्या भावना ऐकून जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार गिरीशजी महाजन यांना मोबाईलद्वारे अवकाळी पावसाची आणि गारपीटीची माहिती देऊन प्रशासनाला सूचना करण्याची विनंती केली. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असे सांगून आ रमेशआप्पा कराड यांना मी लागलीच लातूरला येतोय असा निरोप पालकमंत्र्यांनी दिला.
         आ रमेशआप्पा कराड यांचा फोन आला तेव्हा पालकमंत्री महोदय नाशिक येथील एका कार्यक्रमात होते त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता लातूरला तात्काळ कसे पोहोचावे यासाठी प्रयत्न सुरू केले त्यातच त्यांना माजीमंत्री छगन भुजबळ साहेब हे नाशिकहून लातूरला विमानाने जाणार असल्याची माहिती समजली आणि लागलीच भुजबळ साहेबांशी संपर्क करून त्यांच्या सोबतच *विमानाने लातूरला पोहोचले आणि जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची आढावा बैठक घेऊन प्रशासनाला अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आढावा बैठक संपूवून लागलीच रेणापूर तालुक्यातील रेणापूर नजीक पानगाव फाटा येथील सुरेश उरगुंडे यांच्या शेतातील ज्वारीचे उभे पीक उध्वस्त झाल्याचे डोळ्याने पाहिले आणि रामवाडी ख येथील पंढरी उगिले हनुमंत उगिले यांच्या आंबा फळबागेची पाहणी केली दोन्ही ठिकाणी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी मोठी गर्दी करून झालेल्या नुकसानीची कैफियत पालकमंत्र्यांसमोर मांडली तेव्हा पालकमंत्री महोदयांनी *शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे काळजी करण्याची गरज नाही लवकरच पंचनामे होतील आणि शासन निश्चितपणे मदत केल्याशिवाय राहणार नाही असा *शेतकऱ्यांना दिलासा*दिला.
       दुपारी अवकाळी पाऊस आणि गारपीट होऊन शेतीचे नुकसान झाले. तीन - चार तासातच पालकमंत्र्यांनी येऊन पाहणी केली यावरून असे स्पष्ट होते की, राज्यातील मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वातील शासन राज्यातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेसह शेतकऱ्यांना केंद्रबिंदू म्हणून काम करणारे शासन आहे यात तीळ मात्र शंका नाही. यापूर्वीही सततचा पाऊस, गोगलगाय, अतिवृष्टी यामुळे नुकसानीत सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मदत केली. एवढेच नाही तर मागील महाविकास आघाडी सरकारच्या मदतीपेक्षा म्हणजे दुपटीने हेक्टरी सहा हजार तीनशे ऐवजी तेरा हजार रुपयाची भाजप सेना युतीच्या सरकारने मदत केली आहे. *खरोखरच निर्णय वेगवान महाराष्ट्र शासन गतिमान.

Post a Comment

0 Comments