मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला चालू अधिवेशनात निधी उपलब्ध करून द्या - सय्यद मुजफ्फर अली इनामदार 
औसा प्रतिनिधी
सद्या मुस्लिम समाजाची आर्थिक स्थिती अंत्यत खालावलेली आहे. अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी व मुस्लिम समाजाला प्रवाहात आणण्यासाठी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती करण्यात आलेली होती.परंतू मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळास सद्या निधीची तरतूद नसल्यामुळे निर्मिती करण्यात आलेले आर्थिक विकास महामंडळाची कोणतीही प्रतिपूर्ती होत नाही. सच्चर अहवाल व महेमर्दुर रहेमान अहवालामध्ये अल्पसंख्याक मुस्लिम समाजाविषयी सविस्तर माहिती व सद्यस्थिती दर्शविण्यात आलेली आहे.व तो अहवाल शासनाने स्विकारलेला आहे.त्या अहवालानुसार मुस्लिम समाजासह सर्व अल्पसंख्याक समाज बांधव हे सदरील आर्थिक विकास महामंडळाकडून अनुदान मिळण्यास पात्र आहेत.त्यासाठी निधीची भरपूर अशी तरतूद होणे गरजेचे आहे.सद्या अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात  मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला निधी उपलब्ध करून दिल्यास अल्पसंख्याक समाजाला याचा पूर्ण फायदा होणार आहे. यापूर्वी मागील अधिवेशनात आम्ही 500 कोटीची मागणी केली होती. परंतु शासनाने तेही मंजूर केले नाही.काही जिल्ह्याना निधी देण्यात आला परंतु तोही खर्च करण्यात आलेला नाही.तरी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला चालू अधिवेशनात 1000 कोटीची निधीची तरतूद करण्यात यावी, अन्यथा संबंध महाराष्ट्र लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन  करण्यात येईल याची नोंद घ्यावी.असा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी एम आय एम च्या वतीने व महाराष्ट्र अल्पसंख्याक मंचच्या वतीने  औसा तहसीलदार मार्फत राज्याचे अर्थमंत्री यांना   राज्याचे  8 मार्च बुधवार रोजी निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.यावेळी या निवेदनावर एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार, शेख मौला,हारुणखां पठाण, शेख नय्युम,अजहर कुरेशी,बरकत अली पठाण, एकबाल चांदसाब बागवान, उस्मान शेख, शेख नजीर, सय्यद दस्तगीर,प्रकाश मधुकरराव देशपांडे, अभिजित शिवरुद्र कुरसुळे, पृथ्वीराज हणमंत बिराजदार, महेश मोतीराम चव्हाण, हणमंत श्रीपतराव बिराजदार,ईगवे सदाशिव विठ्ठलराव, अँड फत्तेपूरकर आदिच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments