औसा येथे मोफत नाडी परीक्षण व आरोग्य शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद...
औसा) प्रतिनिधी : - अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्रिंबकेश्वर जिल्हा नाशिक व परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने औसा येथील अन्नपूर्णा नगर, गणेश मंदिर परिसरात आयोजित मोफत नाडी परीक्षण व सर्व रोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात गरजू रुग्णांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .या शिबिरामध्ये शेकडो महिला व पुरुषांनी मोफत नाडी परीक्षण करून घेतले. डॉ. गौरकर व डॉ श्रीमती गभाले यांनी सांधेविकार गुडघेदुखी मणक्याचे आजार कॅन्सर पक्षघात स्त्रियांचे आजार पित्त विकार स्त्री-पुरुषांचे वंध्यत्वाचे प्रश्न मुळव्याध, डोकेदुखी, सर्दी, खोकला, रक्तदाब, पोटदुखी, पोटातील विकार अशा विविध रुग्णांची तपासणी करून त्यांना माफक दरामध्ये औषधे देण्यात आली. तसेच शेकडो रुग्णांना प्रश्नोत्तराच्या माध्यमातून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे लातूर व औसा येथील कार्यकर्ते तसेच माजी नगरसेवक बंडू कोद्रे, पांडुरंग शिंदे, श्री कुंभार यांनी शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रुग्णांची शिस्तीत नोंदणी करून सर्व रुग्णांना मोफत आरोग्य शिबिरामध्ये यशस्वीतेसाठी सहकार्य केले. शिबिरास औसा शहर व परिसरातील गरजू रुग्णांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
0 Comments