औसा येथे शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न
औसा प्रतिनिधी 
शिवजयंती निमित्ताने व महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने आज शिवजयंती तीथीनूसार दिनांक 10 मार्च शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता औसा टी पॉइंट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पूजन करून सरस्वती नगर औसा हनुमान मंदिर येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिरात 47 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य केले. यावेळी या शिबिराला चांगला असा प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये रक्तदान केलेल्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. या शिबिरात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर रक्तपेढी विभाग यांनी या शिबिराला सहकार्य केले. व तसेच सायंकाळी 6 वाजता औसा शहरातून छत्रपती शिवरायांचे प्रतिमेचे पूजन करून भव्य मिरवणूक काढण्यात आली.एकंदरीत सकाळपासून सायंकाळपर्यंत सर्वच कार्यक्रम अति उत्साहात, आनंदात व जल्लोषात साजरे करण्यात आले. या शिबिराच्या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्य उपाध्यक्षा सौ.रेखा नागराळे,मनसे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे, जिल्हा सचिव धनराज गिरी, जिल्हा उपाध्यक्ष सचिन बिराजदार, तालुका अध्यक्ष मुकेश देशमाने, शहराध्यक्ष प्रवीण कठारे,, भाजपच्या नेत्या सोनाली गुळबिले   महेश बनसोडे, रामप्रसाद दत्त,  विवेक दुधनकर, गणेश सूर्यवंशी, वैभव सूर्यवंशी, अमोल थोरात, जीवन जंगाले, सतीश जंगाले, विकास लांडगे, प्रकाश भोंग, महादेव गुरु शेट्टी, गोविंद चव्हाण, गुणवंत लोहार, तानाजी गरड, समाधान फुटाणे, प्रल्हाद क्षीरसागर, किशोर आगलावे, राजेंद्र कांबळे, ईश्वर परिहार, अनिल बिराजदार, आनंद भिसे, अतिक सय्यद, उमाकांत गोरे, युवराज आळणे, अमोल परीहार, अजय चाबुकस्वार, ज्ञानेश्वर गरड, हनुमंत येनगे, प्रदीप बनसोडे आदी मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments