*तपसे चिंचोली येथे महिला दिन साजरा*

औसा :- औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन दिनांक  8 मार्च 2023 रोजी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे व  उपस्थित राहणाऱ्या गावातील  महिलांचे पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला तपसे चिंचोली ग्रामपंचायत सदस्य  रिजवाना मैनू पठाण ,अंगणवाडी पर्यवेक्षिका शशिकला भोसले  , गावची कन्या वकील सोनाली नामदेव जाधव , आरोग्य सेविका मंगल मुसांडे , एमपीडब्ल्यू टाचले एम बी , पप्पाबाई लांडगे, तपसे चिंचोली येथील
अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या. यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षिका शशिकला भोसले यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगितले.यावेळी भोसले आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023 यावर मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुणे सोनाली जाधव यांनी महिला संरक्षण कायदेयाविषयी महत्वपूर्ण माहिती दिली.एमपीडब्ल्यू टाचले यांनी महिलांच्या आरोग्यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन पर्यवेक्षिका शशिकला भोसले यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी 
कालिंदाबाई वडगावे , शकुंतलाबाई चव्हाण , संपताबाई नेटके , छायाबाई कांबळे ,सुजाता कांबळे , सरस्वती निकम ,  विजयालक्ष्मी कलशेट्टी  ,कोमल नेटके  यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments