औसा पंचायत समिती येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा   
औसा प्रतिनिधी
 दिनांक 8 मार्च 2023 रोजी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय ,लातूर तालुका विधी सेवा समिती , औसा, पंचायत समिती ,औसा महिला समुपदेशन केंद्र, पो. स्टे. औसा व ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान बुधोडा यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला      याप्रसंगी  कार्यक्रमाचे अध्यक्ष  एस. एन. भोसले ,न्यायाधीश दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर ,औसा व प्रमुख पाहुणे तहसीलदार भरत सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधीक्षक माननीय  मधुकर पवार, गटविकास अधिकारी  युवराज म्हेत्रे, बालविकास प्रकल्प अधिकारी  किशोर गोरे ,जिल्हा महिला बालविकास विभाग लातूर चे जिल्हा  परिविक्षा अधिकारी    गजानन सेलूकर , जिल्हा संरक्षण अधिकारी  गणेश जोंधळे , विधी सल्लागार  प्रवीण मनाळे ,वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीमती. संध्या जाधव  ,विधीज्ञ मंडळ, औसा, अध्यक्ष, माननीय एडवोकेट विनोद महाजन ,विधिमंडळ सचिव, माननीय एडवोकेट . सचिन पाटील, एडवोकेट  नितीन म्हेत्रे   व ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान बुधोडा चे अध्यक्ष , हरिश्चंद्र सुडे हे उपस्थित होते                             या कार्यक्रमांमध्ये  वरील सर्व मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त करत असताना महिला विषयक कायदे, विविध शासकीय योजना , आरोग्यविषयक माहिती ,महिला बाल विकास विभागाकडील योजना, बाल विकास प्रकल्पातील योजना ,  महिलांसाठीचे संरक्षण , महिला समुपदेशन केंद्रात कडून दिल्या जाणाऱ्या सेवा याविषयी सखोल मार्गदर्शन केले .              या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या .   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,  अनिल रसाळ, प्रशिक्षक ,स्वाधार अंध अपंग पुनर्वसन केंद्र, बुधोडा यांनी केले तर आभार प्रदर्शन महिला समुपदेशन केंद्र ,पोलीस ठाणे, औसा चे समुपदेशक, रविचंद्र वंजारे यांनी केले                            या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता महिला व बालविकास विभाग ,लातूर यांचे वतीने संरक्षण अधिकारी,  प्रवीण चपटे , तालुका व्यवस्थापक, उमेद अभियान,  निवृत्ती भुते, श्रीमती अलका लोखंडे समुपदेशन दीपक सगर, श्रीमती वैशाली राठोड , रणधीर धुमाळ व   बालाजी कांबळे यांनी मोलाचे  योगदान दिले.

Post a Comment

0 Comments