अमर खानापुरे यांच्या वाढदिवसानिमित्त 77 युवकांचे रक्तदान 
औसा प्रतिनिधी 
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अमर खानापुरे यांच्या वाढदिवसानिमित्त फ्रेंड्स क्लब औसा आणि अमर खानापुरे मित्र मंडळ औसा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच लातूर अर्बन ब्लड बँकेच्या सौजन्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक एक मार्च रोजी लातूर वेस हनुमान मंदिर येथे करण्यात आले होते. अमर खानापुरे यांनी फ्रेंड्स क्लब च्या माध्यमातून तसेच काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून समाज जीवनामध्ये आगळे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे अमर खानापुरे मित्र मंडळ व फ्रेंड्स क्लब च्या कार्यकर्त्यांनी समाजातील गरजू रुग्णांना वेळेत रक्तपुरवठा करता यावा या उदात हेतूने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिस्तबद्ध नियोजनातून केलेल्या या भव्य रक्तदान शिबिरामध्ये औसा शहरासह तालुक्यातील 77 युवकांनी उस्फूर्तपणे रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविला. आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने परंतु सर्वसामान्य व गोरगरीब जनतेसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात देत अमर खानापुरे सतत अग्रणी असतात. फ्रेंड्स क्लब आणि अमर खानापुरे मित्र मंडळाने या शिबिराचे आयोजन करून गरज पडताक्षणी रुग्णांना तातडीने रक्त देण्या साठी व्यवस्था केली आहे. या रक्तदान शिबिरामध्ये युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला रक्तदान शिबिर संपन्न करण्यासाठी लातूर अर्बन ब्लड बँकेचे सर्व कर्मचारी तसेच फ्रेंड्स क्लब व अमर खानापुरे मित्र मंडळाचे पदाधिकारी प्रयत्नशील होते.

Post a Comment

0 Comments