औसा येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरचा शुभारंभ
औसा प्रतिनिधी
औसा येथील दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरचा शुभारंभ शनिवार दिनांक 4 मार्च रोजी सकाळी 10 वाजता मुंबई येथील उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा लातूर जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती मंगेश पाटील यांच्या शुभहस्ते व श्रीमती सुरेखा कोसमकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश लातूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी औसा येथील दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर चे न्यायमूर्ती एस एन भोसले व विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अँड विनोद महाजन यांच्यासह औसा येथील विधीज्ञ मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. औसा येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर चा शुभारंभ झाल्याने प्रलंबित असलेली अनेक प्रकरणे आता लवकरात लवकर निकाली निघणार असून न्यायालयीन कामकाज गतिमान होईल अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधीज्ञ मंडळाचे सचिव अँड सचिन पाटील यांनी तर आभार प्रदर्शन अँड सगट यांनी केले.
0 Comments