आम आदमी पार्टीचे लातूर येथे धरणे आंदोलन
मुख्तार मणियार 
आम आदमी पार्टीच्या वतीने आज दिनांक 27 मार्च सोमवार रोजी तहसिल कार्यालय लातूर समोर विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.या धरणे आंदोलनात आंदोलन करत्यांनी शेतकरी व शेतमजूर यांना दरमहा 10 हजार रुपये पेन्शन देण्यात यावे.वीज दरवाढ रद्द करा.गॅस दरवाढ रद्द करा.कंत्राटी नौकर भरती बंद करा.गारपीटाने शेतकऱ्यांचे नूकसान भरपाई हेक्टरी 50 हजार रुपये द्यावे.विरोधी पक्षातील नेत्यावरील ईडी व सीबीआय ची चूकीची कारवाई थांबवावी व तसेच आमदार व खासदार यांची पेन्शन रद्द करा.सरकारी नोकर भरती लवकरात लवकर सुरू करा.लातूर शहरातील शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील त्रुटीवर आळा घालावा.अशा विविध मागण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने तहसिल कार्यालय लातूर येथे आंदोलन करुन लातूर तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.यावेळी आम आदमी पार्टीचे  जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले,व जिल्हा सचिव सय्यद सैजोद्दीन यांच्या नेतृत्त्वाखाली हा धरणे आंदोलन करण्यात आले.या धरणे आंदोलनात आम आदमी पार्टीचे  विजय आचार्य,भागवत कारंडे, विश्वंभर कांबळे,संग्राम जमालपुरे,मंगेश पाटील, सुधाकर सुर्यवंशी, अँडव्होकेट अनील मोरे, मुख्तार मणियार, नितीन जाधव, सय्यद अमीर,तानाजी सुरवसे, आत्माराम श्रीरंग शींदे,दसरथ नागोराव फुटाणे,दगडु वसंत माने,गंगाधर रामभाऊ कांदे,ओंकार गोटेकर, सिध्देश्वर काळे,सचीन औरंगे, राजकुमार गडगळे, मुस्तफा सय्यद, मच्छिंद्र अंकुश माने,सचीन आडमाने अजय पाटील,अरुण पाटील, बाबुराव जंगापल्ले, उत्कर्ष शिंदे,मनोहर पाटील आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments