बाजार समिती निवडणुकी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची 27 मार्च रोजी बैठक
औसा प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समिती औसाची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्याशी चर्चा करून निवडणुकी संदर्भात पक्षाची भूमिका ठरविण्यासाठी दिनांक 27 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय आयसीआयसीआय बँकेच्या पाठीमागे औसा येथे बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये निवडणूक लढविण्यासंदर्भात कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकून घेऊन ठोस निर्णय घेण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बैठकीस वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भरत सूर्यवंशी, माजी सभापती योगीराज पाटील, सुभाष पवार, विधानसभा अध्यक्ष दत्तात्रय कोळपे, बबनराव भोसले, कार्याध्यक्ष नरेंद्र पाटील, युवा नेते श्रीकांत सूर्यवंशी, माजी उपनगराध्यक्ष जावेद शेख, सभापती गोविंद जाधव, व लियाखत पठाण, संगमेश्वर उटगे, दिलीप लवटे, अविनाश टिके, रुपेश दुधनकर, पठाण अमर बिराजदार, कृष्णा सावळकर, अशोक गरड, गणपती नरहारे, गजेश्वर शिंदे, मुकेश पवार यांनी केले आहे.
0 Comments