खासदार सुधाकर शृंगारे यांना भिम आर्मी चे निवेदन 
लातूर:----
दि 25 रोजी राहूल नगर मधील नागरिकांना घेऊन खासदार सुधाकर शृंगारे यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले गेल्या अनेक वर्षांपासुन राहूल नगर उटगे नगर येथील नागरिकांची तक्षशिला बौद्ध विहार विकसित करण्याची मागणी आहे. त्या ठिकाणी असलेल्या लोकांना गेले अनेक वर्षांपासून पाणी टंचाई चे चटके सहन करावे लागत आहेत. त्यासाठी सन्माननीय खासदार साहेबांनी त्या ठिकाणी पिण्याची पाईप लाईन तसेच बोअरवेल उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच तक्षशिला बौद्ध विहार हे बौध्द समाजाचे श्रद्धास्थान असल्यामुळे त्या ठिकाणी आपण तक्षशिला बौद्ध विहार सुशोभीकरण करून तसेच बौद्ध विहाराच्या समोरील दोन्ही बाजुंनी कमान बांधून राहूल नगर ची शोभा वाढवावी व भागातील विविध कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले यावेळी भिम आर्मी चे महाराष्ट्र प्रदेश संघटक अक्षय धावारे जिल्हा सचिव बबलू शिंदे जयंती अध्यक्ष विशाल पैठणे विनोद मुंडे प्रल्हाद पाडुळे किशोर मोरे लतेश आवटे सतिष मस्के उषा धावारे सुमन पाडुळे रेखा कांबळे राधा मस्के रंजना गवळी साविञी बल्लाळ वैशाली आवटे गोदाबाई धावारे ज्योती दहिरे कांताबाई अवचारे सकुबाई धावारे साधना ढगे कविता बनसोडे मंगल मोरे महादेव धावारे  सिताबाई बल्लाळ महादेव अवचारे विद्याबाई धावारे नितीन मुंडे आदी राहूल नगर मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments