रिंगण लाईव्ह च्या नाम फलकाचे उद्घाटन संपन्न
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील शेतकरी शेतमजुरांच्या संकल्पनेतून रिंगण लाईव्ह ह्या मराठवाड्यातल्या होऊ घातलेल्या पहिल्या टीव्ही चॅनल च्या कार्यालय नामफलकाचे उद्घाटन मनोगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष तिप्पणप्पा दादा राचट्टे यांच्या शुभहस्ते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवानिवृत्त सचिव अॅड श्याम कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक 24 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न झाले. महाराणा प्रताप नगर औसा येथे रिंगण लाईव्ह या टीव्ही चॅनल चे कार्यालय सुसजरीत्या तयार झाले असून नामफलकाच्या अनावरण सोहळा संपन्न झाला.या प्रारंभी रिंगण लाईव्ह चे निर्माते संपादक राजू पाटील यांनी प्रास्ताविकातून रिंगण लाईव्ह ची भूमिका विषद केली. याप्रसंगी मुस्लिम कबीर, औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरे, पत्रकार जलील पठाण, व विजयकुमार बोरफळे यांनी शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले. औसा तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजुरांच्या मुलाच्या संकल्पनेतून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत होऊ घातलेले रिंगण लाईव्ह टीव्ही चॅनल अल्पावधीत नवा रुपाला येईल अशी अपेक्षा मान्यवरांनी याप्रसंगी व्यक्त केली. रिंगण लाईव्ह चे निर्माते राजू पाटील यांनी हे टीव्ही चॅनल शेतकऱ्यांचा आत्मा असून शेतकरी शेतमजुरांना केंद्रबिंदू मानून विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेसमोर येणार असल्याचे सांगितले.या कार्यक्रमासाठी सर्वश्री विनायक मोरे, दत्ता व्हंताळे , रमेश दुरुगकर,एस ए काझी, मुख्तार मणियार, आसिफ पटेल, इलियास चौधरी, मजहर पटेल, किशोर जाधव,तौफिक कुरेशी,पाशा शेख बालाजी ऊबाळे,वामन अंकुश, बाळू कल्याणी, यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते. अँड. शाम कुलकर्णी यांनी अध्यक्ष सुमारोपातून या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम कांबळे यांनी केले.
0 Comments