*मुक्तेश्वर संगीत समारोह आणि कथ्थक नृत्याने श्रोते मंत्र मुग्ध* 
औसा प्रतिनिधी -औसा शहराचे ग्रामदैवत मुक्तेश्वर देवालय न्यास आणि मुक्तेश्वर संगीत सभा यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नववर्षानिमित्त बुधवार दिनांक 22 मार्च रोजी आयोजित संगीत समारोह आणि कथक नृत्य कार्यक्रमाला श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली .उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांच्या हस्ते आणि तहसीलदार भरत सूर्यवंशी व सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉक्टर ब्रिज मोहन झुंबर यांच्या उपस्थितीत सायंकाळी सात वाजता संगीत समारोहाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये पंडित वेदांग धाराशिवे आणि पंडित विजयकुमार धायगुडे यांचे शास्त्रीय गायन झाले. तर तेजस धुमाळ यांचे सोलो तबलावादनाने श्रुती तल्लीन झाले होते. सूर्यकांत घोडके आणि एकनाथ पांचाळ यांनी उत्कृष्ट रित्या हार्मोनियमची साथ संगत केली. मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी संगीत समारोह आणि कथक नृत्याचा कार्यक्रम मंदिर समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये गुरु श्वेता तंत्रे पाटील व त्यांचा समूह यांनी उत्कृष्टरित्या कथकनर्र्त्याचा आविष्कार करून रसिक श्रृत्यांची मनी जिंकली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंदिर समितीचे अध्यक्ष ॲड मुक्तेश्वर वाघदरे रविशंकर राचट्टे, धनंजय कोपरे, उमाकांत मुरगे ,प्रकाश वाघमारे रमेशअप्पा राचट्टे, ऍड विशाल वाघदरे, ऍड भीमाशंकर कारंजे ,ऍड धुळाप्पा रेवशेट्टी, ऍड विजयकुमार कारंजे, रवींद्र कारंजे यांच्यासह मंदिर समितीचे पदाधिकारी प्रयत्नशील होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज हलकुडे यांनी केले कार्यक्रमासाठी औसा शहर व तालुक्यातील शेकडो महिला पुरुष उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments