*औसा येथे हमीभावाने हरभरा खरेदी सुरू- खरेदी केंद्राची जिल्हाधिकाऱ्याकडून पाहणी*
औसा: औसा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या वतीने यावर्षीच्या 2022 23 हंगामात किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत हमीभावाने प्रतिक्विंटल ५३३५ रू दराने हरभरा खरेदीस सुरुवात झालेली आहे. भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाने (नाफेड ) मंजुरी दिलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ( मार्केटिंग फेडरेशन) अंतर्गत औसा येथे प्रथम शेतकरी विनायक कागे यांच्या हस्ते हरभरा खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी खरेदी-विक्री संघाचे सभापती संतोष सोमवंशी, उपसभापती शेखर चव्हाण उपस्थित होते.तसेच शासनाकडून हरभरा नोंदणीसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 
      दिनांक 15 मार्च रोजी सदरील खरेदी 
केंद्रास लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी भेट देऊन पाहणी केली व मार्गदर्शक सूचना केल्या . यावेळी महाराष्ट्र बाजार समिती संघाचे उपसभापती तथा खरेदी विक्री संघाचे सभापती संतोष सोमवंशी, जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने ,जिल्हा उपनिबंधक नाईकवाडे ,जिल्हा मार्केटिंग अधिकारी विलास सोमारे, तालुका सहनिबंधक अशोक कदम ,तालुका कृषी अधिकारी ढाकणे ,बाजार समिती सचिव संतोष हूच्चे, व्यवस्थापक गणेश क्षीरसागर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments