जुन्या पेन्शनच्या मागणी आंदोलनास काँग्रेस पक्षाचा पाठिंबा
 औसा प्रतिनिधी
 सन 2005 नंतर शासकीय व निमशासकीय सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन न देण्याचा निर्णय घेतला आहे परंतु दीर्घकाळ सेवा करून शासकीय व निमशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर वृद्धापकाळ मध्ये असणारा पेन्शन योजनेचा आधार व इतर योजना सरकारने हिसकावून घेतल्या आहेत. जुनी पेन्शन योजना शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना लागू करावी या मागणीसाठी राज्यातील कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारला असून औसा तहसील कार्यालयासमोर असलेल्या या आंदोलनास काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे आणि शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक शेख शकील यांनी पाठिंबाचे पत्र देऊन जुनी पेन्शन योजना लागू करावी. या मागणीचे  समर्थन दिले आहे. कर्मचारी संघटनेचा वतीने वेगवेगळी मोर्चे धरणे आंदोलन करून जुन्या पेन्शनची मागणी होत असताना सरकार कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. 14 मार्चपासून कर्मचारी बेमुदत संपावर असताना शासनाची 2005 नंतर सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांची मागणी रास्त असताना उदासीनता दिसत आहे. तरी सदर आंदोलनास काँग्रेस पक्षाचे संपूर्णतः समर्थन आहे असे पत्र प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे यांच्या वतीने शिष्टमंडळाद्वारे कर्मचारी संघटनेस देऊन 20 मार्च रोजी त्यांनी पाठिंबा दर्शविला आहे.

Post a Comment

0 Comments