भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या अध्यक्षपदी आशिष बनसोडे
 औसा प्रतिनिधी 
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी औसा येथील आशिष राजाभाऊ बनसोडे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. जयंती समितीच्या बैठकीमध्ये ही निवड घोषित करण्यात आली. यावर्षीचा जयंती सोहळा भव्य दिव्य स्वरूपामध्ये साजरा करण्याचा संकल्प जयंती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या उपाध्यक्षपदी आनंद बनसोडे, सचिव शरद बनसोडे, सदस्य लखन सातपुते, प्रथमेश बनसोडे, प्रवीण बनसोडे, नेताजी बनसोडे, निलेश कांबळे, आशुतोष बनसोडे यांची निवड कार्यकारणी मध्ये करण्यात आली आहे. दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी होणाऱ्या जयंती कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम भीम गीताचा कार्यक्रम तसेच शालेय व महाविद्यालयीन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भीम नगर समता नगर आणि बौद्ध नगर येथे ध्वजारोहण व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून जयंती समितीच्या पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments