औसा शहरात येत नसलेली  कचरा घंटागाडी  चालू करा -पवन कांबळे 
औसा प्रतिनिधी 
  औसा शहरामध्ये जवळपास 10 15 दिवस झाले कचरा घेण्यासाठी घंटागाडी येत नाही. ज्यामुळे 10 ते 15 दिवस जमा कचरा हा नागरीकांच्या घरामध्ये जमा आहे व कांही भागात तो नागरिकांकडून टाकला जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. हे असे राहिल्यामुळे रोगराई पसरून कित्येक नागरिक आजारी पडले आहेत. एवढ्या दिवसापासून लोकांचे हाल होत असतानाही संबंधीत स्वच्छता विभागाचे अधिकारी कंत्राटदाराला हे घंटागाडीचे कंत्राट दिले गेले आहे त्यांना कसलाच फरक पडत असलेला दिसत नाही. आम्हा सर्व नागरिकांची आपणास विनंती आहे की, संबंधीत म कंत्राटदार यांना आदेशीत करून कचरा घंटागाडी चालु करावी तसेच प्रत्येक प्रभागातील मुख्य ठिकाणी कचरा डब्बे बसवावेत जेणेकरुन कधी एक दोन दिवस तांत्रिक कारणामुळे घंटागाडी नाही आली तरी नागरिकांकडून तेथे कचरा जमा करण्यात येईल.

 तरी मुख्याधिकारी यांनी यावर लवकरात लवकर कार्यवाही करुन नागरिकांचे होणारे हाल थांबवावे. अन्यथा औसा विधानसभा युवक कॉंग्रेस व शहरातील नागरिकांकडून तिवर आंदोलन करण्याचा इशारा औसा विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पवन अंगद कांबळे यांनी आज रोजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.यावेळी निवेदन देताना गणेश कसबे,धिरज म्हस्के, भानुदास पुंड यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments