कुळवाडी भूषण छत्रपती शिवरायांच्या जयंती सोहळ्यात शिवप्रेमींनी सहभागी व्हावे 
औसा (प्रतिनिधी)दि.१८
औसा शहरातील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने कुळवाडी भूषण छत्रपती शिवरायांचा जन्म जयंती सोहळा शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा,  रक्तदान शिबिर शिवरायांच्या जीवन कार्यावरील पोवाडा अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. तसेच छावा ग्रुप च्या वतीने शिव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. रविवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता तानाजी चौक औसा येथे पारंपारिक पद्धतीने ध्वजारोहण कार्यक्रम महंत राजेंद्र गिरी महाराज मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप मोरे,  यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात येणार आहे. शहरातील हनुमान रोड, लातूर वेस  हनुमान मंदिर चौक,  मुक्तेश्वर रोड,  व अप्रोच रोड चौकामध्येही छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार असून सायंकाळी सहा वाजता औसा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.याप्रसंगी तहसीलदार भरत सूर्यवंशी व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत जयंती समितीच्या वतीने औसा शहरातील विविध समाजातील अध्यक्षांना निमंत्रण पत्र देऊन शिवजन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होण्याची विनंती करण्यात आली आहे. हा उपक्रम यावर्षी समितीने प्रथमच राबविला असून औसा शहर व तालुक्यातील शिवप्रेमी जनतेने हजारोच्या संख्येने जयंती सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जयंती समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments